होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

मुक्ताईनगर तालुक्यात गारपिटीचा तडाखा: आ. चंद्रकांत पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; पंचनाम्यांचे दिले आदेश!

मुक्ताईनगर तालुक्यात गारपिटीचा तडाखा: आ. चंद्रकांत पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; पंचनाम्यांचे दिले आदेश!

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):

मुक्ताईनगर मतदारसंघातील चांगदेव, हरताळा आणि अंतुर्ली परिसरात दि. २ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

​नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना आ. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी उपस्थित तहसीलदार गिरीश वखारे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे कडक निर्देश दिले. पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“संकटाच्या या काळात शासन आणि आम्ही स्वतः शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कोणाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही,” असे आश्वासन आ. पाटील यांनी यावेळी दिले.

​या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

#Muktainagar, #चंद्रकांतपाटील,  #UnseasonalRain, #MaharashtraNews, #FarmerSupport, #MLAChandrakantPatil, #Garpiit, #AgricultureLoss, #MarathiNews, #MuktaiDoot,

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!