होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

‘हा कोणता नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय?’ रोहिणी खडसेंचा भाजपवर प्रहार

Follow Us:

‘हा कोणता नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय?’ रोहिणी खडसेंचा भाजपवर प्रहार

मुंबई/जळगाव: वारकरी संप्रदायातील ‘प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी’वरून सुरू झालेला राजकीय कलगीतुरा आता व्यक्तिगत टीकेपर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “भाजपने हा कोणता नवीन ‘तात्या विंचू’ मार्केटमध्ये आणला आहे?” असा सवाल करत त्यांनी राजकीय वातावरणात ठिणगी टाकली आहे.

​शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील ६० टक्के मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे मत एका लेखात व्यक्त केले होते. यावरून भाजपने पवारांवर टीकेची झोड उठवली. या टीकेला उत्तर देताना रोहिणी खडसे आक्रमक झाल्या. त्यांनी तुषार भोसले यांच्या ‘आचार्य’ पदवीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “स्वतःला आचार्य म्हणवून घेणाऱ्यांना ही पदवी कोणी दिली, याचा तपास व्हायला हवा. काही लोक वारकरी संप्रदायाचा आडोसा घेऊन समाजात द्वेष आणि फूट पाडण्याचे काम करत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

लबाड लांडग्यांवरच पवार साहेबांची टीका! रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले. “पवार साहेबांनी अशाच लबाड लांडग्यांवर टीका केली आहे, जे वारकरी संप्रदायाचे पांघरूण घालून जाती-धर्मात तेढ निर्माण करतात,” असे सांगत त्यांनी जुन्या घटनांची आठवण करून दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संप्रदायाचा आडोसा घेऊन मिळालेल्या धमकीचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आम्ही संत मुक्ताबाई आणि बहिणाबाईंचे वैचारिक वारस आहोत, त्यामुळे असा द्वेष पसरवणाऱ्यांना आम्ही रोखणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पवारांच्या ६० टक्क्यांच्या आकड्यापेक्षाही संख्या जास्त; अमोल मिटकरींचा दावा

वारकरी संप्रदायातील घुसखोरीवरून सत्ताधारी-विरोधात जुंपली

प्रतिनिधी: शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवरून राज्यात दोन तट पडले आहेत. पवारांच्या विधानाचा बचाव करताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे. पवारांनी वारकरी संप्रदायात ६० टक्के प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचे म्हटले आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या त्यापेक्षाही अधिक असू शकते, असा दावा मिटकरींनी केला आहे.

नेमका वाद काय? दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत शरद पवारांनी एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, “वारकरी संप्रदायात काही ठिकाणी प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाली असून सुमारे ६० टक्के मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे.” या विधानावरून भाजपने पवारांना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला, तर पवारांच्या समर्थकांनी ही टीका संप्रदायावर नसून त्यातील ‘प्रवृत्तीं’वर असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे:

  • रोहिणी खडसे: तुषार भोसले यांच्यावर ‘तात्या विंचू’ अशी उपमा देऊन टीका.
  • अमोल मिटकरी: पवारांच्या ६० टक्के आकडेवारीपेक्षा वास्तव अधिक गंभीर असल्याचा दावा.
  • धर्मांधता: वारकरी संप्रदायाचा राजकीय वापर करणाऱ्यांना रोखण्याचे राष्ट्रवादीचे आव्हान.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!