होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

​॥ संपादकीय मनोगत ॥

Follow Us:

​॥ संपादकीय मनोगत ॥
​आदिशक्तीच्या आशीर्वादाने, लोकशाहीचा नवा ‘मुक्ताई दूत’ तुमच्या सेवेत!
​”आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी…” या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायाचे वैभव असलेल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत आळंदी, त्र्यंबकेश्वर आणि सासवड यांसोबतच मुक्ताईनगर हे भक्तीचे उगमस्थान मानले जाते. आणि हे चारही तिर्थक्षेत्र महाराष्ट्रातील संत दर्शनाचे सर्वोच्च धाम मानले जातात.जिथे साक्षात आदिशक्ती मुक्ताई साहेबांनी संजीवन अंतर्धान समाधी घेऊन या मातीला चैतन्याचा स्पर्श दिला, अशा पवित्र तिर्थक्षेत्रातून दैनिक वृत्तपत्र क्षेत्रात एक नवे पाऊल पडत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
​”जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ॥”
​समर्थ रामदास स्वामींच्या या ओवीला प्रमाण मानून, गेल्या १० वर्षांपासून ‘मुक्ताई वार्ता’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून आम्ही सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या अमाप प्रेमामुळेच आज हे धाडस करणे शक्य झाले आहे. आता मुक्ताईंच्याच प्रेरणेने आणि भारत सरकारच्या ‘प्रेस सेवा पोर्टल’च्या अधिकृत मान्यतेने (RNI),नोंदणी करून आम्ही दैनिक, “मुक्ताई दूत” या नव्या रूपात आपल्या सेवेत रुजू होत आहोत.
​आमची भूमिका: सत्याचा जागर, जनहितैषी निर्धार
​पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून, तो समाजमनाचा आरसा आहे. जशी मुक्ताईंची वाणी “ताटीच्या अभंगातून” उपदेशाचे अमृत पाजते, तसेच दै ‘मुक्ताई दूत’ समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल आणि वंचितांच्या हक्कासाठी लढेल.
​”सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता॥” या तुकोबांच्या विचारांप्रमाणे, आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता केवळ सत्याची कास धरू, असा आमचा शब्द आहे.
​ऋणनिर्देश आणि कृतज्ञता
​मुक्ताईनगरच्या या पावन भूमीत दर पंधरवाडी एकादशीला येणारे लाखो वारकरी, स्थानिक नागरिक आणि जगभरातील आमचे प्रेक्षक हेच आमचे खरे बळ आहेत. तुमच्या विश्वासाच्या जोरावरच ‘डिजिटल’ ते ‘दैनिक’ असा हा प्रवास आम्ही सुखकर करू शकलो.
​प्रेरणा: आदिशक्ती संत मुक्ताई साहेब
​संकल्प: लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक
​सारथी: संपादक संतोष मराठे व दै.’मुक्ताई दूत’ परिवार
​तुमची साथ कायम असू द्या, कारण हे दैनिक केवळ आमचे नाही, तर ते प्रत्येक सामान्य माणसाचे व्यासपीठ आहे. मुक्ताई साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्यांनी आम्हाला सन्मार्गावर चालण्याची बुद्धी आणि जनसेवेचे बळ द्यावे.
​”मुक्ताई मुक्ताई… जय जय मुक्ताई!”
रामकृष्णहरी
​आपला नम्र,
संतोष सुपडू मराठे
(संपादक, दैनिक, “मुक्ताई दूत”)

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!