मुक्ताईनगरच्या पुनर्वसनाचा वनवास संपला! आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश; ३८५ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!
मुंबईतील संयुक्त बैठकीत मोठा निर्णय; 4 थ्या टप्प्यातील 413 व 3 ऱ्या टप्प्यातील 22 घरांसह मतदारसंघातील 25 गावांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी!
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुक्ताईनगर शहरातील चौथ्या टप्प्यातील ४१३ घरे आणि राजकीय आकसापोटी रखडलेल्या तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनासाठी, तसेच मतदारसंघातील विविध गावांच्या नागरी सुविधांसाठी ३८५ कोटी रुपयांच्या भरीव निधीला आज मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मान्यता देण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे.
मंत्रालयात रंगली संयुक्त बैठक
आज मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत पुनर्वसन आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडला.
या गावांचे भाग्य उजळणार
या ३८५ कोटींच्या निधीतून मुक्ताईनगर शहरासह मतदारसंघातील खालील गावांच्या नागरी सुविधा आणि घरांचे प्रश्न सुटणार आहेत:
- प्रमुख गावे: भोकरी, पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, ऐनपूर, अंतुर्ली, धामणदे, नरवेल, पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा, शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, धामोडी,मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक आणि आंदलवाडी, सिंगत
अन्याय दूर झाला, शब्द पाळला!
तत्कालीन काळात राजकीय सूडबुद्धीने तिसऱ्या टप्प्यातील ज्या २२ घरांचे पुनर्वसन थांबवण्यात आले होते, त्यांनाही आता न्याय मिळाला आहे. आमदार पाटील यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण केल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,आ.चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, यांच्यासह भाजपा रावेर लोकसभा संपर्क प्रमुख नंदकुमार महाजन, महाराष्ट्र राज्य ‘माफदा’ अध्यक्ष विनोद तराळ आणि संबंधित गावातील प्रमुख प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Muktainagar Rehabilitation fund,
- MLA Chandrakant Patil News,
- Girish Mahajan Jalgaon,
- Muktai Doot News,
- Rehabilitation Ministry Maharashtra,
- 385 Crore Fund Muktainagar,
#BreakingNews,
#Muktainagar,
#JalgaonNews,
#ChandrakantPatil,
#Rehabilitation,
#VikasParva,
#Development,
#MaharashtraGovernment,
#GirishMahajan,
#MakarandPatil,
#JusticeForFarmers,









