होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

झिरवाळ यांचा तो व्हिडिओ ‘एडिटेड’; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Follow Us:

झिरवाळ यांचा तो व्हिडिओ ‘एडिटेड’; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, व्हिडिओची सत्यता पडताळूनच पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

नेमकी चर्चा काय?

​झिरवाळ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. “हा व्हिडिओ तीन-चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे, माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असून याची सखोल चौकशी व्हावी,” अशी विनंती झिरवाळ यांनी केली आहे. त्यावर फडणवीस यांनी त्यांना तातडीने तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला असून सायबर सेलच्या माध्यमातून व्हिडिओची शहानिशा केली जाणार आहे. “जर व्हिडिओ खरे असतील तर कारवाई होईलच, पण सत्यता तपासणे प्राथमिक कर्तव्य आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांचा कट की षडयंत्र?

​दुसरीकडे, आमदार अमोल मिटकरी यांनी हा प्रकार ‘प्री-प्लॅन्ड’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कॅप्टन खरात प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी आठ महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला.

अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री

​याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल टंचाई आणि लॉकडाऊनच्या अफवा फेटाळून लावल्या. “देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असून लॉकडाऊन लागणार नाही. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल,” असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!