मुक्ताईनगर येथे ‘अपंग जनता दला’ची राज्यस्तरीय बैठक संपन्न
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : अपंग जनता दल सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिव्यांग बांधवांची राज्यस्तरीय बैठक जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील मुक्ताई पॅलेसमध्ये नुकतीच उत्साहात पार पडली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ दिव्यांग नेते अनिस शेख (पत्रकार) यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.
या बैठकीत बोलताना संस्थापक अध्यक्ष अनिस शेख व राज्य अध्यक्ष जाकीर शेख यांनी संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर व दिव्यांगांच्या हक्कांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेची नवीन कार्यकारिणीदेखील जाहीर करण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्हाध्यक्षपदी सीताराम काका साहेब, तर मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मुजीब शाह यांची निवड करण्यात आली.
यासोबतच खालील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या:
- जळगाव जिल्हा उपाध्यक्ष: गणेश भोबे (मुक्ताईनगर)
- यावल तालुकाध्यक्ष: ऐसान शेख
- मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष: अमोल चोपडे
- रावेर प्रतिनिधी: विजय पवार
या बैठकीला राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, राज्य संपर्क प्रमुख लक्ष्मण, राज्य उपाध्यक्ष कुणाल झाल्टे, गणेश मगर, जालना जिल्हाध्यक्ष नूर चौधरी, वाघे, राज्य महिला अध्यक्षा मीनाताई धोत्रे, राज्य महिला उपाध्यक्ष सरला लुले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. बैठकीस राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








