होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

इंधन अन् गॅसचा साठा मुबलक; अफवांवर विश्वास ठेवू नका

Follow Us:

इंधन अन् गॅसचा साठा मुबलक; अफवांवर विश्वास ठेवू नका

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन; पुरवठा साखळी सुरळीत

जळगाव | जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडरसह पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णतः सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
​जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे, तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पेट्रोल पंप डीलर्स उपस्थित होते. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नसल्याची खात्री प्रशासनाने केली असून, वितरणावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:

  • नियमित पुरवठा: पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा असून वितरण विनाव्यत्यय सुरू आहे.
  • गॅस वितरण: शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार गॅस सिलेंडरचे वितरण करण्याच्या सूचना.
  • अफवांकडे दुर्लक्ष: सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशांना बळी पडू नका.
  • नियोजन: हॉटेल व्यावसायिक व उद्योजकांच्या अडचणींवर सकारात्मक चर्चा.

​नागरिकांनी केवळ दैनंदिन गरजेनुसारच इंधन खरेदी करावी, साठेबाजी किंवा घाबरून जाऊन गर्दी करू नये, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!