मुक्ताईनगर नगरपंचायत टाकणार ‘विकासाचा’ गियर; २३४ ठराव मंजूर.
नगराध्यक्षा संजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांचा ‘सिंहावलोकन’.
मुक्ताईनगर न.पं. सर्वसाधारण सभेमध्ये: २८८ पैकी २३४ विषयांवर मंजुरीची मोहोर.
मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीची महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा सोमवारी (३० मार्च) नगराध्यक्षा संजना चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत शहरातील प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकीय बाबींशी संबंधित तब्बल २३४ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली असून, विकासाला गती देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या विषयपत्रिकेवर प्रशासकीय कामकाज आणि शहराच्या सर्वांगीण विकासाशी निगडित एकूण २८८ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी लोकहिताचे आणि अतिशय महत्त्वाचे २३४ विषय सभागृहाने बहुमताने मंजूर केले. उर्वरित ५४ विषयांबाबत तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सखोल चर्चा आवश्यक असल्याने, त्यांना तूर्तास स्थगिती देऊन पुढील सभेमध्ये विचारविनिमय करण्याचा ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आला.
याप्रसंगी पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा संजना पाटील यांच्यासह मुख्याधिकारी दीपक पुदाके, उपनगराध्यक्षा देवयानी निलेश शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या कामकाजात सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध सूचना मांडल्या. सभेचे प्रशासकीय नियोजन कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी यांनी केले, तर कामकाजात किशोर सैतवाल, सुनील चौधरी व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या मंजुरीमुळे मुक्ताईनगर शहरातील विकासकामांना आता नव्याने गती मिळणार आहे.
Development Surge in Muktainagar Nagar Panchayat: 234 Resolutions Approved in General Body Meeting
Muktainagar (Correspondent):
A significant General Body Meeting of the local Nagar Panchayat was held on Monday (March 30), under the chairpersonship of the Honorable President (Nagaradhyaksha) Mrs. Sanjana Chandrakant Patil. The meeting, conducted in a positive atmosphere, witnessed the approval of 234 subjects related to pending development projects and administrative matters by a majority, reinforcing the commitment to accelerating the city’s progress.
The meeting commenced at 11:00 AM at the Nagar Panchayat Hall. A comprehensive agenda consisting of 288 subjects concerning administrative operations and the holistic development of the city was presented for discussion. Out of these, 234 crucial subjects of public interest were approved by the house with a majority. Due to technical and administrative reasons requiring further deliberation, the remaining 54 subjects were temporarily stayed, and a resolution was passed to revisit them in the next meeting.
The proceedings were presided over by the Presiding Officer and popularly elected President, Mrs. Sanjana Patil, in the presence of Chief Officer Mr. Deepak Pudake and Vice-President Mrs. Devyani Nilesh Shirsat. All honorable corporators (men and women) actively participated in the session and submitted various suggestions. The administrative planning of the meeting was managed by Office Superintendent Mr. Pankaj Suryawanshi, with support from staff members Mr. Kishore Saitwal, Mr. Sunil Chaudhary, and others. Following these approvals, development works in Muktainagar city are set to gain fresh momentum.








