होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

निधन वार्ता : स्व. दयाराम किसन आढाव (पाटील) यांचे दुःखद निधन

निधन वार्ता : स्व. दयाराम किसन आढाव (पाटील) यांचे दुःखद निधन

हरिभक्तीचा तेजस्वी दीप मालवला…

मुक्ताईनगर परिसरातील धार्मिक, सामाजिक व वारकरी क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध कीर्तनकार तथा ह.भ.प. दयाराम महाराज म्हणून परिचित असलेले स्व. दयाराम किसन आढाव (पाटील) (वय ७३) यांचे दि. २५ मे २०२६, सोमवार रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

मुळचे रा. पिंपळखुटा, ता. नांदुरा येथील असलेले स्व. आढाव हे हल्ली तहसील रोड समोर, झांबरेवाडा, सरस्वतीनगर, मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय, संत साहित्य आणि मुक्ताई भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.

धार्मिक व सामाजिक कार्याचा सुवर्णकाळ

सन १९७५ ते १९९३ या कालावधीत स्व. दयाराम आढाव (पाटील) यांनी श्रीक्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर समाधी स्थळाचे व्यवस्थापक म्हणून अत्यंत निष्ठेने व सेवाभावाने कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात मंदिर व्यवस्थापनात शिस्त, भक्तीभाव आणि धार्मिक परंपरांचे जतन याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

याच काळात त्यांनी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली पालखी सोहळ्यास भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेची नवी उंची लाभली.

स्व. आढाव हे केवळ व्यवस्थापक नव्हते, तर एक प्रभावी कीर्तनकार आणि अध्यात्मिक मार्गदर्शक होते. “ह.भ.प. दयाराम महाराज” या नावाने त्यांनी अनेकांच्या हृदयात श्रद्धेचे स्थान निर्माण केले. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन, भक्ती आणि संस्कारांची शिकवण लाभत असे.

अंत्ययात्रा

त्यांची अंत्ययात्रा दि. २६ मे २०२६, मंगळवार रोजी सकाळी ९:३० वाजता राहते घर, मूळगाव पिंपळखुटा ता. नांदुरा येथून निघणार आहे.

ते “माझी माऊली” चॅनलचे गणेश आढाव (पाटील) यांचे वडील होत.

भावपूर्ण श्रद्धांजली

“भक्ती, सेवा आणि संस्कारांचा अखंड वारसा जपणारा एक संतस्वभावी व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेला…

परंतु त्यांच्या कीर्तनरूपी वाणीचा आणि सेवाभावी कार्याचा सुगंध कायम भक्तांच्या स्मरणात दरवळत राहील.”

आई मुक्ताई त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो…

॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!