होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

शहादा येथे तृतीयपंथीयांसाठी जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन

Follow Us:

शहादा ( प्रतिनिधी ) – राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची सर्वांगीण उन्नती व्हावी, तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शहादा येथे तृतीयपंथीयांसाठी जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नंदुरबार आणि पंचायत समिती, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

शासनाच्या ११ मार्च २०२४ रोजीच्या सर्वंकष धोरणानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकात समाज कल्याण निरीक्षक सचिन वसंत जगताप यांनी कार्यशाळेचा उद्देश व तृतीयपंथीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी अशासकीय सदस्य राजू ठाकरे यांनी तृतीयपंथीयांचे हक्क, कायदे तसेच विविध कल्याणकारी योजनांविषयी मार्गदर्शन केले. तृतीयपंथीयांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

पंचायत समितीच्या विविध योजनांविषयी सहाय्यक गट विकास अधिकारी विकास राठोड यांनी माहिती दिली. गट विकास अधिकारी महेश पोतदार यांनी तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार तृतीयपंथीयांसाठी सुरू करण्यात आलेल्या बीज भांडवल योजनेअंतर्गत व्यवसाय उभारणी तसेच कर्ज प्रकरणांच्या प्रक्रियेची माहिती सचिन जगताप यांनी दिली.

कार्यशाळेमुळे तृतीयपंथीय घटकातील व्यक्तींना त्यांच्या हक्कांविषयी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तृतीयपंथीयांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमास विस्तार अधिकारी संजय मराठे, अशासकीय सदस्य इरफान पिंजारी, बार्टी संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी मीनाक्षी
दांडेवेकर, स्मार्ट सर्व्हिसेसचे शुभम जावरे, राकेश पावरा यांच्यासह तृतीयपंथीय प्रतिनिधी गौरी गुरु, आरती नायक, गोपी जान, सनम जान, सोनाली कुंवर, शिवानी कर्मा आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती व समाज कल्याण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तृतीयपंथीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळवून देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!