शहादा ( प्रतिनिधी) – महाराज जनार्दन पोहऱ्या वळवी कला, वाणिज्य आणि श्री. व्ही. के. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, धडगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाबा जनार्दन पोहऱ्या वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम आ. सा. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतभाई वळवी व सचिव मा. अरुणभाई वळवी , महाविद्यालयाचे मा. डॉ. संजय गायकवाड, यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार व , प्र. प्राचार्य डॉ. राजु पवार सर यांच्या प्रमुख उपस्थित यशस्वीरित्या संपन्न झाला. संस्थेच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना सातत्याने चालना मिळत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. महाराज बाबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त सुरुवातीला व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ राजू पवार व डॉ. अशोक राठोड लाभले होते. दोन्ही प्रमुख व्यक्तींनी महाराज बाबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत बाबांची जीवनपट आणि त्यांचे राजकीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल ची माहिती आपल्या मनोगततून विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. अनिल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रासेयो सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. हरिभाऊ पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व आयोजनासाठी महाविद्यालयातील महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. कल्पना साळवे मॅडम व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.







