संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचा ७८.५७ टक्के निकाल
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): स्थानिक संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल ७८.५७ टक्के लागला असून, विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे.
या परीक्षेत कु. संजना संजय मिल हिने ५०० पैकी ४०९ गुण (८१.८०%) मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. तसेच अक्षय सुनील काटे याने ४०५ गुण (८१.००%) मिळवून द्वितीय, तर मोहिनी अनिल पाटील हिने ४०० गुण (८०.००%) मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. रावसाहेब शेखावत, सचिव मा. डॉ. अशोक चव्हाण, मुख्याध्यापक श्री. एन. डी. काटे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयाच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.







