
मुक्ताईनगर, ता. २६ : राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित भव्य ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा’ आज बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील ऐतिहासिक श्री संत मुक्ताई जुन्या मंदिराच्या पवित्र सानिध्यात अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात सुरू झाला.

श्रावण शुक्ल १३, शके १९४८ अर्थात बुधवारपासून सुरू झालेल्या या भव्यदिव्य आध्यात्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसर वारंवार हरिनाम व विठ्ठल गजराने दुमदुमून गेला आहे. या सोहळ्यात भाविकांना श्री संत मुक्ताई यांच्या पवित्र चरित्राचे श्रवण तसेच प्रसिद्ध मर्मज्ञ व प्रवचनकारांच्या सुमधूर वाणीतून श्रीमद् भागवत कथेचा लाभ मिळणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात सकाळी काकडा आरती, विष्णु सहस्रनाम, गाथा भजन, संत मुक्ताई चरित्र वाचन, दुपारी संगीतमय श्रीमद् भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ व नामांकित कीर्तनकारांची प्रवचने व कीर्तनांचे कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानुसार विशाल महाराज खोले यांच्या सुश्राव्यवाणीतून संत मुक्ताई चरित्र तर खगेंद्र महाराज शहादेकर यांच्या अमृततुल्यवाणीतून श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

तसेच रमेश महाराज आडविहीरकर, धनराज महाराज अंजाळेकर, शास्त्री भक्ती प्रियदासजी महाराज सावदा , कन्हैया महाराज ब्रह्मपूर, मानेकर बाबा शास्त्री सावदा, गोपाल चैतन्य महाराज पाल, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांची तत्वज्ञानयुक्त प्रवचने तर माऊली महाराज पठाडे कर्जत, अक्रूर महाराज साखरे गेवराई बीड, सोपान महाराज सानप हिंगोली, उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी, पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा, भरत महाराज बेळीकर, विशाल महाराज खोले यांची सुश्राव्य कीर्तनाची मालिका तर रविंद्र हरणे महाराज यांच्या श्रीमुखातून काल्याच्या कीर्तनाचा श्रावणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

या अध्यात्मिक ज्ञानयज्ञाच्या प्रारंभप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, सौ.मंदाताई खडसे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणीताई खडसे, शारदाताई चौधरी, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, सतपंथ संप्रदायांचे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज,संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, डॉ. सुनील नेवे, निवृत्ती पाटील, आदिन्सह असंख्य मान्यवर व परिसरातील हजारो भाविक, वारकरी संप्रदायाचे बंधू-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अमृतमहोत्सवी सोहळ्यात व सप्ताहात परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतचरित्र व भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Muktainagar, Aug 26: The grand ‘Amrit Mahotsav Akhand Harinam Saptah, Sangeet Shree Sant Muktai Charitra, and Sangeet Shrimad Bhagwat Katha Dnyan Yagna Sohalla’—organized on the occasion of the 75th birthday (Amrit Mahotsav) of senior state leader and former minister MLA Eknathrao Khadse—commenced today, Wednesday, August 26, 2026, in a deeply devout and enthusiastic atmosphere at the sacred premises of the historical Old Shree Sant Muktai Temple in Kothali (Taluka Muktainagar, District Jalgaon).

Beginning on Wednesday, Shravan Shukla 13, Shake 1948, this magnificent spiritual festival has filled the entire surrounding area with the reverberations of Harinam and chants of “Vitthal”. During this event, devotees will have the opportunity to listen to the sacred life story of Shree Sant Muktai and experience the sweet exposition of Shrimad Bhagwat Katha by renowned scholars and narrators. Various religious activities have been organized daily for the festival, including Kakad Aarti, Vishnu Sahasranama, Gatha Bhajan, and Sant Muktai Charitra reading in the morning; musical Shrimad Bhagwat Katha in the afternoon; and Haripath along with lectures and kirtans by prominent artists in the evening. Accordingly, devotees will get to listen to the Sant Muktai Charitra presented by Vishal Maharaj Khole and the Bhagwat Katha narrated by Khagendra Maharaj Shahadekar.

Additionally, spiritual discourses will be delivered by Ramesh Maharaj Advahirkar, Dhanraj Maharaj Anjalekar, Shastri Bhakti Priyadasji Maharaj Savda, Kanhaiya Maharaj Brahmapur, Manekar Baba Shastri Savda, Gopal Chaitanya Maharaj Pal, and Mahamandleshwar Janardan Hari Maharaj. A series of kirtans will feature Mauli Maharaj Pathade (Karjat), Akroor Maharaj Sakhare (Gevrai, Beed), Sopan Maharaj Sanap (Hingoli), Ulhas Maharaj Suryavanshi (Alandi), Purushottam Maharaj Patil (Buldhana), Bharat Maharaj Belikar, and Vishal Maharaj Khole. The event will conclude with the traditional Kala Kirtan by Ravindra Harne Maharaj.
The inauguration of this spiritual program was attended by Union Minister of State Rakshatai Khadse, former minister MLA Eknathrao Khadse, Mandatai Khadse, NCP (Sharadchandra Pawar) State President Adv. Rohinitai Khadse, Shardatai Choudhary, Sant Muktai Sansthan President Adv. Ravindra Bhaiyasaheb Patil, Satpanth Sampradaya Mahamandleshwar Janardan Hari Maharaj, Sant Muktai Palkhi Sohalla Chief Ravindra Harne Maharaj, Dr. Sunil Neve, Nivrutti Patil, along with numerous dignitaries, thousands of devotees, members of the Warkari community, and local residents. The Amrit Mahotsav Committee has invited all devotees from the region to attend the week-long festival in large numbers and seek the blessings of the Sant Charitra and Bhagwat Katha.







