होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

कोथळी येथे भीषण अपघात : दुचाकींच्या जोरदार धडकेत युवक जागीच ठार

कोथळी येथे भीषण अपघात : दुचाकींच्या जोरदार धडकेत युवक जागीच ठार

 

दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी; हॉटेल योगायोग समोरची घटना

 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे शनिवारी (दि. 24 मे 2026) रात्री भीषण दुचाकी अपघात होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरजवळील भुसावळ रोडवरील हॉटेल योगायोग समोर रात्री सुमारे 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. हॉटेलच्या मागील बाजूकडून दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या नामदेव भिल (रा. कोथळी) याने कोथळीहून मुक्ताईनगरकडे जात असलेल्या पवन नामदेव चौधरी (वय 32, रा. कोथळी) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

 

धडक इतकी भीषण होती की, पवन चौधरी हे रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार नामदेव भिल हाही गंभीर जखमी झाला असून त्यास तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!