होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शहाद्यात विशेष शिबिर

Follow Us:

बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शहाद्यात विशेष शिबिर

रक्षाबंधनाच्या दिवशी युवकमित्र परिवाराचा उपक्रम; अनाथ व निराधार बालकांच्या प्रस्तावांची मोफत पूर्तता करणार

प्रतिनिधी | शहादा:

अनाथ आणि निराधार बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी राबविल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी २८ ऑगस्ट रोजी शहादा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू बालकांचे प्रस्ताव मोफत भरून घेतले जाणार आहेत.


अनाथ, निराधार तसेच विविध कारणांमुळे पालकांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ पात्र बालकांना मिळवून देण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी शहादा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवकमित्र परिवार, कोळी या शासनमान्य संस्थेच्या वतीने शहादा शहरातील स्टेट बँकेसमोर असलेल्या महात्मा फुले स्मारक स्थळी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.

शहादा तालुक्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ व निराधार बालके, एकल पालक असलेली बालके, आई किंवा वडिलांचा अथवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेली बालके, कोरोनाकाळात पालकांचे निधन झालेली बालके, दिव्यांग किंवा गंभीर आजारग्रस्त पालकांची बालके तसेच विधवा, विधुर किंवा घटस्फोटित पालकांची बालके या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

अनेक पात्र बालकांना योजनेची माहिती न मिळाल्याने किंवा आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शनासह पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मोफत तयार करून दिले जातील व कागदपत्रांची पूर्तता करून मंजुरीसाठी पाठवले जातील. शहादा तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवकमित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


दरमहा मिळणार २,२५० रुपयांची मदत

बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी शासनाकडून दरमहा २ हजार २५० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. आर्थिक अडचणींमुळे बालकांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांना शिक्षणाची योग्य संधी मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.


 शिबिराची वेळ व ठिकाण

हे विशेष शिबिर २८ ऑगस्ट रोजी शहादा येथील स्टेट बँकेसमोरील महात्मा फुले स्मारक स्थळी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे. युवकमित्र परिवार संस्थेमार्फत या ठिकाणी गरजू पालकांना मार्गदर्शन व प्रस्तावांची मोफत पूर्तता करून दिली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!