होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

जळगावात शिवसेनेचा ‘शिवदुर्गा – शिवसंवाद दौरा’ उत्साहात

जळगावात शिवसेनेचा ‘शिवदुर्गा – शिवसंवाद दौरा’ उत्साहात;

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती निश्चित!

​जळगाव/मुक्ताईनगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यव्यापी ‘शिवदुर्गा – शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यांतर्गत आज मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ आणि जामनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या भव्य आणि उत्साही बैठका पार पडल्या.
​आगामी निवडणुकांमध्ये महिला आघाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने, प्रत्येक प्रभाग, गाव आणि शाखास्तरावर महिला पदाधिकाऱ्यांचे सक्षम जाळे उभारण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

प्रत्येक बूथ मजबूत करण्यावर भर

​या संवाद दौऱ्यादरम्यान नव्या महिला शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करून पक्ष विस्ताराला गती देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदारयादी पुनरीक्षण (SIR) मोहीम प्रभावीपणे राबविणे, बूथनिहाय रचना अधिक मजबूत करणे आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत थेट जनसंपर्क वाढवून स्थानिक पातळीवर निवडणुकांची प्रभावी रणनीती आखण्या संदर्भात प्रमुख नेत्यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. शिवसेनेचे विचार आणि शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पक्षसंघटना अधिक भक्कम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिवसेनेच्या बड्या महिला नेत्यांची उपस्थिती


​शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकींना पक्षाच्या उपनेत्या व प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे, उपनेत्या संजना घाडी, माजी आमदार निर्मला गावित, प्रवक्त्या सुशीबेन शाह आणि राजश्री हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वच नेत्यांनी उपस्थित महिलांमध्ये आगामी लढाईसाठी नवा जोश भरला.


​या यशस्वी बैठकांसाठी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नंदा निकम, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जामनेर तालुका प्रमुख भरत पवार यांच्यासह स्थानिक संपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, लोकसभा व विधानसभा समन्वयक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुक्ताईनगरसह संपूर्ण परिसरातून या बैठकींना महिला कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!