मुक्ताईनगर: मुक्ताईनगर शहरातील आनंद ट्रेडर्ससमोरील रहिवासी असलेले संदीप अशोक शिंदे हा तरुण दि. २० ऑगस्ट २०२६ पासून घरात कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेला आहे.
कुटुंबीयांनी आप्तस्वकीय, मित्रपरिवार आणि परिसरामध्ये त्याचा कसून शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. याप्रकरणी त्याचा चुलतभाऊ महेंद्र रामभाऊ शिंदे यांनी मुक्ताईनगर पोलिसात अधिकृतपणे हरविल्याची तक्रार (मिसिंग रिपोर्ट) दाखल केली आहे.
संदीप अशोक शिंदे यांच्याबद्दल कुठेही माहिती किंवा तो दिसून आल्यास कृपया खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबियांतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क व्यक्ती: महेंद्र रामभाऊ शिंदे (चुलत भाऊ)
मोबाईल क्रमांक: ९९२३० २९५०६
हरवला आहे..
On: August 26, 2026 2:06 PM







