होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

बोदवडमध्ये पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत; नगराध्यक्षांच्या तत्परतेमुळे युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

बोदवडमध्ये पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत; नगराध्यक्षांच्या तत्परतेमुळे युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

​बोदवड: शहरात आज शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार होता, मात्र हिंगणा फाट्याजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा तात्पुरता खंडित झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
​लोकप्रतिनिधी थेट घटनास्थळी
​पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष पती दिनेश माळी आणि नगरसेविका पुत्र तथा हर्षल बडगुजर यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट हिंगणा फाट्यावरील घटनास्थळ गाठले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः उपस्थित राहून लिकेज दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करून घेतले आहे.

​संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार
​”पाईपलाईन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, आज शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बोदवड शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल.”
— मीराताई माळी, नगराध्यक्षा, बोदवड

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!