जिल्हा बँक प्रतिनिधी मतदानासाठी ना.रक्षा खडसे -आ.चंद्रकांत पाटील ठराव
मुक्ताईनगर तालुक्यातील सहकारी संस्थांमधून मतदारांचे ठराव; ३० मतदारांना मतदानाची संधी
मुक्ताईनगर |
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधून मतदारांचे ठराव सादर होत आहेत. खडसे व पाटील यांच्या नावांना समर्थन देणारे ठराव करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत मतदारांचे ठराव सादर केले जात आहेत. २४ ऑगस्टपर्यंत केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी दोन सहकारी संस्था व आमदार चंद्रकांत पाटील यांनी एक सहकारी संस्थेमधून आपले ठराव मुक्ताईनगर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे दिले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यात एकूण ३० विविध कार्यकारी सहकारी संस्था असून जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधून मतदारांचे ठराव घेतले जात आहेत. या संस्थांमधून ३० मतदारांना जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडीसाठी मतदान करता येईल.
२ सप्टेंबरपर्यंत ठराव देण्याची मुदत असून २४ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील १८ विविध कार्यकारी सहकारी संस्थांतील मतदारांचे ठराव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात प्राप्त झाले आहेत.
यामध्ये तालुक्यातील घोडसगाव व कर्की येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेमधून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. निमखेडी खुर्द येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा ठराव, अंतुर्ली येथे माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ, मुक्ताईनगर येथे आमदार एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे.
काकोडे येथून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कोंडेलकर, कुऱ्हा येथून सरपंच डॉ. बी. सी. महाजन, भोटे येथून माजी सभापती निवृत्ती पाटील, पिंपरीनांदू येथून संतोष पाटील, चांगदेव येथे श्रीराम पाटील, शेमळदे येथे दिलीप पाटील, पुणाडी येथे संदीप देशमुख, उचंदे येथे माणिक पाटील, सातोड येथे मंदाबाई पाटील, निमखेडी बुद्रुक येथे दिनकर देशमुख, इच्छापूर येथे जितेंद्र पाटील, धामणगाव येथे नदीमुखा अमीनख्वा, वडोदे येथे सुभाष खिरेडकर यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे.
— मतदानाचा आधार
मुक्ताईनगर तालुक्यात जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी ३० मतदारांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधून मतदारांचे ठराव घेऊन ते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सादर केले जात आहेत.
— ठराव सादर करण्याची मुदत
जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडीसाठी ठराव सादर करण्याची अंतिम मुदत २ सप्टेंबरपर्यंत आहे. २४ ऑगस्टपर्यंत मुक्ताईनगर तालुक्यातील १८ विविध कार्यकारी सहकारी संस्थांतील मतदारांचे ठराव कार्यालयात प्राप्त झाले आहेत.






