होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

दैनिक मुक्ताई दूतचा दणका! ‘डॉक्टर कोण? कर्मचारी कोण? अधिकारी कोण?’ या प्रश्नावर प्रशासनाची तातडीची हालचाल; आमदार चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना कानउघडणी

Follow Us:

दैनिक मुक्ताई दूतचा दणका!
‘डॉक्टर कोण? कर्मचारी कोण? अधिकारी कोण?’ या प्रश्नावर प्रशासनाची तातडीची हालचाल; आमदार चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना कानउघडणी

मुक्ताईनगर : अमोल वैद्य
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील ‘डॉक्टर कोण? कर्मचारी कोण? अधिकारी कोण?’ या गंभीर प्रश्नावर दैनिक मुक्ताई दूतने प्रकाश टाकत रुग्णालयातील ड्रेसकोड, ओळखपत्र, जबाबदाऱ्यांची स्पष्टता आणि रुग्णांना मिळणाऱ्या सेवांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची लागलीच दखल घेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत रुग्णालयातील कारभारात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले.
दैनिक मुक्ताई दूतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाच्या पातळीवर हालचालींना वेग आला असून, दुसऱ्याच दिवशी जिल्हा शल्यचिकित्सकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे वृत्तपत्रातील प्रश्न केवळ कागदावर न राहता त्याची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याचे चित्र आहे.
‘पुन्हा असं व्हायला नको’; आमदारांची अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद
उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेबाबत चर्चा करताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रुग्णांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना कोण डॉक्टर आहे, कोण कर्मचारी आहे आणि कोण अधिकारी आहे, याबाबत संभ्रम निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती शिस्त व व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. येथे येणारा रुग्ण आधीच आजारपणाच्या त्रासात असतो. अशा वेळी त्याला उपचार देणाऱ्या व्यक्तीची ओळख, त्याची जबाबदारी आणि योग्य मार्गदर्शन स्पष्ट असणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून रुग्णसेवेचा मूलभूत भाग आहे.
अनावश्यक ‘रेफर’ला आळा; विशेष कागदपत्र करण्याचे निर्देश
दरम्यान, उपचारासाठी इतरत्र रुग्ण पाठविण्याच्या अर्थात ‘रेफर’ करण्याच्या प्रक्रियेबाबतही आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. ज्या रुग्णांना खरोखरच पुढील उपचारासाठी रेफर करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘स्पेशल पेपर’ करावा; मात्र उगाचच रुग्णांना जिल्ह्याच्या रुग्णालयाकडे पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
यामुळे उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांचा अधिकाधिक प्रभावी वापर होणे आणि केवळ कारण नसताना रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्याची प्रवृत्ती कमी होणे अपेक्षित आहे.
वृत्त प्रसिद्ध झाले आणि दुसऱ्याच दिवशी बैठक!

दैनिक मुक्ताई दूतने उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा शल्यचिकित्सकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याने या वृत्ताची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
या बैठकीत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची ओळख, ड्रेसकोड, ओळखपत्र, रुग्णांना मिळणारे मार्गदर्शन, रेफरलची प्रक्रिया तसेच रुग्णालयीन व्यवस्थेतील अन्य बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पत्रकारितेचा खरा ‘इम्पॅक्ट’!
एखाद्या वृत्तपत्राचे काम केवळ बातमी छापणे एवढेच नसते; जनतेच्या प्रश्नांना प्रशासनाच्या टेबलापर्यंत पोहोचवणे आणि त्या प्रश्नांवर कार्यवाही घडवून आणण्यासाठी लोकशाहीतील जागरूक प्रहरी म्हणून भूमिका बजावणे, ही पत्रकारितेची खरी ताकद आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्नावर दैनिक मुक्ताई दूतने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांची तातडीची बैठक आयोजित झाली. त्यामुळे ‘दैनिक मुक्ताई दूत इम्पॅक्ट’ ही केवळ जाहिरातबाजी नसून जनतेच्या प्रश्नावर पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारितेची प्रत्यक्ष नोंद ठरत आहे.
आता बैठकीनंतर केवळ सूचना आणि आदेश कागदावर न राहता उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेत प्रत्यक्ष बदल कधी दिसतो, याकडे मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला योग्य डॉक्टर, जबाबदार कर्मचारी, स्पष्ट मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार मिळणे, हीच या संपूर्ण प्रकरणाची खरी कसोटी ठरणार आहे.
दैनिक मुक्ताई दूतने प्रश्न उपस्थित केला; प्रशासनाने दखल घेतली. आता अंमलबजावणीची वेळ आहे!

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!